पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८०) यांनी हिंदुस्थानचे दारिद्रय नावांचा एक लेख लिहिलेला असून त्यांत इ. स. १८७९ साली वायव्येकडील प्रांतापैकी एका जिल्ह्याच्या कलेक्टराची हकीगत दिली आहे. या कलेक्टराने सरकारच्या हेतूप्रमाणे मुद्दाम डोळेझांक करावयाची सोडून आपल्या जिल्ह्यांत अन्नावांचून लोक मरत आहेत असा रिपोर्ट केला, व हजारों गरिबांचे प्राण वांचविले. परंतु याचा शेवट असा झाला की, त्याच्या नांवावर काळी रेघ पडली आणि त्याला मध्यप्रांतांत बदलले. शेवटी आपले हक्क विनाकारण बुडविले, आतां आपल्या खालच्या लोकांस बढती मिळून आपणांस कुचमत राहवे लागणार, असे पाहून बिचाऱ्याने त्रासून नोकरीचा राजीनामा दिला. अशा अनेक गोष्टी घडत असतील. असें होते म्हणून खालपासून वरपर्यंत बहुतेक सर्व अधिकारी आपआपल्या शिफारसीकरितां शेतकऱ्यांस पिळून काढितात आणि ते कर्ज बाजारी झाल्याच्या दोषांचे खापर सावकारांच्या माथी फोडून त्यांची स्थिति सुधारण्याकरितां पंजाब लँडएलिनिएशन किंवा खोतीबिलासारखे एकादें बिल पुढे आणितात, आणि आपल्या चुकीने होणाऱ्या धाताबद्दल दुसऱ्यांस शिक्षा करू इच्छितात. असो. कारणांबद्दल मतभेद जरी असला, तरी हिंदुस्थानांतील शेतकरी आज अत्यंत दरिद्री झाले आहेत, ही गोष्ट खाजगी लोकांप्रमाणे सरकारी अंमलदारांनाही कबूल आहे. त्यांना सुकाळाच्या वर्षीदेखील आषाढ आणि श्रावण हे