पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) कुळाच्या पदरांत पैसा पडण्यापूर्वी स्टँप घेऊन आणि मग तो रोखा रजिस्टर कचेरीत नोंदून त्याला बरेच पैसे प्रथम सरकारच्या पदरांत टाकावे लागतात. शेतकऱ्याची पैदास्त कायती शेतांतले उत्पन्न. त्यांतूनच त्याला सरकारच्या विलक्षण करामुळे तीसपट जास्त महाग झालेले मीठ घ्यावे लागते. रुपया धाऱ्यावर एक आणाप्रमाणे लोकलफंड भरावा लागतो. आपली गुरे चारण्याबद्दल फी द्यावी लागते. तो म्युन्सिपल हद्दीत रहात असेल तर त्याला घरपट्टी वगैरे म्युन्सिपालिटीच्या पट्या भराव्या लागतात. शिवाय त्याच्या खपाच्या दुसऱ्या किरकोळ जिनसांवर सरकारी किंवा म्युनिसिपालीटीचे जे जे कर असतील तेही अप्रत्यक्ष रीतीने त्याच्याच डोक्यावर बसतात. अशा कचाट्यांतून त्याचा निभाव कसा लागावा ? साऱ्याच्या वसूलीसंबंधाने नियमच पाहूं गेलें, तर ते कांहीं सवलतीचे आहेत, व दुष्काळासारख्या प्रसंगी तर त्यांत शेतकऱ्यांस बऱ्याच सवलतीही दिल्या आहेत. परंतु नियम करणे निराळे आणि त्याप्रमाणे वागणे निराळे. माणसाची परीक्षा त्याने आपल्या टेबलापुढे लावून ठेवलेल्या गोडगोड नियमांवरून न करितां ती त्याच्या वर्तनावरूनच केली पाहिजे. एकाद्या वेळी आमचे सरकार नियम चांगले करितें, परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र होत नाही. इतकेच नव्हे, तर अंमलबजावणी होऊ नये, असाच सरकारच्या राज्यपद्धतीचा कटाक्ष दिसतो. मि. आलफ्रेड नंदी