पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७७) असें मटले ह्मणजे याच्या जवळची पुजी संपली असें समजन खशाल उठतात. आणि त्याचा मीठभात गोड करून आपआपल्या घरी जातात. या दोन्ही प्रसंगांचे भोजनसमारंभ पाहणाराची त्यांच्या काटकसरीपणाबद्दल-अथवा त्यांच्या दारिद्रयाबद्दल म्हटले तर अधिक शोभेल-खात्री झाल्यावांचून राहणार नाही. एक ढक्कूभातावांचून दुसरे काही नाही! याला काय उधळपट्टी ह्मणावयाची, की काटकसर म्हणावयाची ? मला वाटते याला दारिद्य म्हणणेच जास्त शोभेल. शेतकऱ्यांच्या कर्ज बाजारीपणाची मूळउत्पत्ति, गल्लया ऐवजीं नक्तींत सारे घेण्याच्या आणि तेही पुष्कळ प्रांतातून पिके तयार होण्याच्या पूर्वी आणि सर्वत्र अत्यंत जबर घेण्याच्या पद्धतींतच आहे, असें अनेक देशी व विदेशी विद्वानांचे मत आहे. इ. स. १८७४ साली दक्षिणेतील शेतकरी लोकांनी सरकारच्या फाजील वाढलेल्या जमीनधाऱ्याच्या नेटाच्या मागणीने आणि सावकारांच्या जांचाने त्रासून दंगा केला, आणि सावकार लोकांची कोणाची नाकें कापली, कोणाला भाजले, कोणाला मारले, कोणावर दरोडे घालून जे हाती लागले तें लांबविलें, आणि बहुतेकांचे जमाखर्चाचे कागद आणि खतेपत्रे यांचा नाश केला. तेव्हां सरकारच्या नेहमीच्या पद्धतीस अनुसरून या दंग्याच्या कारणांचा शोध करण्याकरितां एक कमिशन नेमण्यांत आले. या कमिशन