पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७६) खर्चाची चौकशी करण्याकरितां विलायतेंत जें कमिशन बसले होते, त्या पुढे साक्ष देतांनां सर डेव्हिड बार्बर साहेब ह्मणालेः " हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांस कोठें खर्च करावा, कोठे नाही, हे चांगले समजत असून ते फार काटकसरीने वागतात." सर रोमेशचंद्र दत्त, नामदार पारख, व रावबहादूर फाटक यांचेही पुष्कळ निरीक्षण व अभ्यासाच्या अंती असेंच मत झाले आहे. शेतकऱ्यांच्या बहुतेक जातीत लग्नामध्ये मुलीच्या बापास मुळीच खर्च करावा लागत नाही. सर्व खर्च बहुधा मुलाच्या बापासच करावा लागतो. व तो बहुतेक करून ज्यांचे लग्न करावयाचे त्या मुलास, रकमेच्या मानानें कांहीं वर्षांच्या कराराने एकाद्या मनुष्याकडे नोकर ठेवून खर्चाकरितां रक्कम काढतो. नोकराची धडीपगडी, खाणेपिणे वैगरे सर्व खर्च यजमानाच्या अंगावर असल्यामुळे या युक्तीनें त्याला कोणतेही प्रकारे व्याज वगैरे भरावें न लागतां त्याचे काम होते व मुलगाही चांगल्या ठिकाणी वागून संसाराला उपयोगी झाला ह्मणजे चाकरीची मुदत सरतांच घरी परत येतो. दिवसासंबंधाने किंवा मार्तकाच्या खर्चासंबंधे पाहूं जातांही त्यांच्यावर कर्जाचा बोजा बसण्याचे विशेष कारण नसते. जातीचे लोक ज्याच्या घरी मर्तिक झाले असेल त्याच्या घरी त्याची स्थिति पाहूनच जात असतात. आणि पंगत बसल्यावर एकदां यजमानानें “ पाणी घ्या"