पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७५) आणि आमच्या नेटिव्ह सैन्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा होत असलेला हास आणि त्यांना आलेलें दारिद्र्य आमच्याच्याने आतां पाहवत नाही.” परंतु या शेतकऱ्यांच्या दारिद्र्याबद्दल लोक काय ह्मणतात, ते पाहून आही कल्पना करावयाची ह्मणजे हातांतले कंकण पहाण्यास आरशाचे सहाय्य घेण्यासारखेच वेडेपणाचे आहे. ज्याला हिंदुस्थानचे शेतकरी अत्यंत दरिद्री झाले आहेत, हे आमचें विधान खोटे वाटेल त्याने आपले शहर सोडून थोडे खेड्यांत जाऊन पहावें. ह्मणजे त्याची खात्री होईल. - अवश्य तितकींच लांकडे असलेलें, पेंढ्या पाकळीने शिव लेले आणि कुडाला शेकडों भोके पडलेलें तें घर, तो मडक्यागाडग्यांचा संसार, ती अन्न न मिळाल्यामुळे हातापायाच्या काड्या आणि पोटाचा नगारा झालेली "बाबा बाबा ! बय बय !" करून भाकरीच्या एका तुकड्यासाठी एकमेकांशी भांडणारी त्याची पोरें, तें वैरणीवांचून उठवणीस आलेले एकाददुसरे ढोर, वगैरे पाहून या बिचाऱ्याची अशी भयंकर स्थिति कां झाली असावी, असा प्रश्न सहाजिकच उत्पन्न होतो. - काही लोक असें ह्मणतात की, शेतकरी फार उधळपट्टी करितात, लग्ने आणि दिवस यांस त्यांचा फार खर्च होतो, ह्मणून ते दरिद्री झाले. परंतु डेक्कन रयत कमिशनाचा अभिप्राय याहून फार निराळा आहे. ते ह्मणतातः " लग्न कार्याच्या खर्चाने शेतकरी कर्जबाजारी झाले असें ह्मणून उगाच या खर्चाला महत्व दिले आहे." हिंदुस्थानच्या