पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७४) वसाहतींत, जाणाऱ्या आमच्या केवळ मजूरी किंवा फार तर हळीचा धंदा करणाऱ्या गरीब लोकांस आज जो तुमच्या भलभलत्या नियमांपासून त्रास होत आहे, त्यांना तुमच्या अगदी हाडामांसाच्या गोऱ्या कातडीच्या सुधारलेल्या लोकांकडून अगदी एकाद्या पशूप्रमाणे जें वागविण्यात येत आहे, त्यांची काही दाद लावा. आमचे दरबानांत असलेले ब्यारिस्टर गांधी दक्षिण आफ्रिकेतील हिंदलोकांविषयी काय गा-हाणे गात आहेत ते पहा, आणि धेदेशिक्षणाकरितां मागें तिसऱ्या कारणाचा विचार करीत असतां सूचविल्याप्रमाणे कांहीं स्कालरशिपा ठेवा. सर मंगळदास नथूभाईनी हे करून आपले नांव अजरामर करून ठेवलेच आहे. त्यांतच तुमची भर पडूं द्या झणजे झाले. या दोन गोष्टी जरी तुझी आज केल्यात, तरी पुरे आहे ! दहावे कारण-आतापर्यंतच्या एकंदर विवेचनावरून हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांची सध्यां फार दैना झाली आहे. त्यांना सुकाळांत सुद्धा अर्धपोटी राहावे लागते; वगैरे गोष्टी बऱ्याच स्पष्ट रीतीने वाचकांपुढे आल्या आहेत. इ. स. १८५८ साली ब्राईट साहेब पार्लमेंट सभेत ह्मणालेः " हिंदुस्थानांत मुख्य भरणा म्हटला ह्मणजे शेतकऱ्यांचा. त्यांची स्थिति फार वाईट आहे. ते अत्यंत दरिद्री, अगदी हताश आणि फार कष्टी झाले आहेत.” परवां नुकतेच लार्ड कर्झन साहेबांनीही हेच बोलून दाखविले. ते ह्मणाले: “ पंजाबचे शेतकरी ह्मणजे हिंदुस्थानच्या लोकसंख्येचे भूषण