पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७३) पदराला खार लावून आपल्या कुटुंबाचे सर्व प्रकारचे पाश बाजूला सारून , आणि दूर प्रवासाचा त्रास सोसून केवळ आपले व आपल्या देशाचे कल्याण करण्याच्या सद्धेतूनें परदेशगमन करतील, त्यांना परत येतांच जर आम्ही हिडिस् फिडिस् करूं लागलों, त्यांची जेवणाची पाने आपणापासून दूर अंतरावर मांडूं लागलों, त्यांच्या हातचे अन्नपानादि व्यवहार आपण बंद केले, तर आपण किती कृतघ्न ठरूं? ज्यांनी सत्कार्ये करावीत त्यांच्या मिशा भादरण्याला आमी आपले वस्तरे पाजवावेत हा मोठा नीचपणा आहे. हे मोठे अज्ञान आहे. याकरिता असे लोक परदेशांतून परत येतांच त्यांच्या मिशा भादरण्याची तयारी न करितां आम्ही त्यांस सन्मान देण्याची तयारी केली पाहिजे. हे लोकांचे कर्तव्य झाले. आतां सरकार, तें तर समर्थच आहे. एवढासा जपान देश, त्याने सरकारी प्रयत्नानें फक्त वीस वर्षांत केवढी प्रगति केली ? काय व्यापार वाढविला ? मी मी म्हणणाऱ्या फ्रान्स, इंग्लंड, जर्मनीसारख्या देशांसही त्याने कसें आश्चर्यचकित केलें ? अशी सरकारची गोष्ट असते. त्यांच्या शक्ति मोठ्या असतात. हिंदुस्थान सरकार मनांत आणील तर आमची पक्की खात्री आहे की, दहावीस वर्षांतच आमी शेतकऱ्याचे कारागीर बनूं. परंतु इतकी मोठी गोष्ट त्यांच्या मनांत येण्यास अवधीही मोठाच लागेल. म्हणून सध्या आमची त्यांस इतकीच सूचना आहे की, येथून परक्या देशांत निदान तुमच्या