पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७२) तां जातात, पण त्यांपैकी बरेचसे ब्यारिस्टर आणि कांहीं डाक्टर होऊन येतात. कारागीर एकदेखील नाही. सदर विवेचनावरून आमच्या येथे जे दुष्काळ पडतात ते लोकसंख्येच्या वाढीने पडत नाहीत. तर सर्वच लोक शेतकीच्या क्षेत्रांत घुसतात, उद्योगधंदे करून देशांत कलाकौशल्याची आणि त्याच्या योगाने बनविलेल्या वस्तंची वाढ करीत नाहीत; एकंदरीत त्यांना उद्योगाची आवड नसते; ते देशांत उद्योग करीत नाहीत किंवा परदेशी जाऊन तो कसा करावा हे शिकूनही येत नाहीत, यामुळे ते पडतात, हे वाचकांच्या लक्ष्यांत आलेच असेल. ही देशस्थिति बदलली पाहिजे. रसायनादि शास्त्रांचा अभ्यास करून पदव्या मिळविलेल्या लोकांनी स्वस्थ न बसतां प्रो. बोस, प्रो. गज्जर आणि प्रो. शंकरराव भिसे यांच्याप्रमाणे त्यांनी काही नवीन कल्पना काढल्या पाहिजेत, आणि आम्ही अशा सद्गृहस्थांस द्रव्यद्वारा मदत करून आमच्या देशाच्या दुष्काळरूपी शत्रूस दूर झिडकारून लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज आमचे दुसरे कर्तव्य म्हणजे परदेशगमन करून परत येणाऱ्या लोकांवर धर्माच्या नावाखाली आह्मीं जो जुलम करितां तो बंद करणे. कालदेशवर्तमानाकडे लक्ष्य देऊन लोकांचे सुख वाढविण्याकरितां चालीरीतींत अवश्य तितके फेरफार केलेच पाहिजेत. असे फेरफार पूर्वी झाले आहेत आणि पुढेही झाले पाहिजेत. जे गृहस्थ आपल्या