पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिले तर हल्ली लहानसान पगारांच्या जागासुद्धां युरोपियन आणि युरोजियन लोक पतकरूं लागले आहेत. अशारीतीने आमच्या बहुजनसमाजाचे दारिद्रय सारखे वाढतच जाईल अशी चिन्हें दिवसेंदिवस अधिक दिसू लागली आहेत. या कामी राष्ट्रीय फंड उभारावा, ह्मणून आह्मी या निबंधांत जी सूचना केली आहे, तशा प्रकारचा फंड उभारूनच कलकत्यास शास्त्रीय व औद्योगिक शिक्षणाची संस्था गुदस्त साली स्थापन झाली आहे. तसेच रा. काळे यांचा पैसा फंड व रा. गोखले यांचा रुपया फंडही याच धोरणावर आहेत. परंतु कलकत्त्याप्रमाणे इकडे त्या फंडांस यश आल्याचं अद्यापि दिसत नाही. -दुष्काळपीडितांस मदत करण्याकरितां ह्मणून प्राप्तीवर प्रथम कसा कर बसविण्यांत आला हे आमच्या वाचकांस माहितच आहे. सन १९०० सालच्या दुष्काळाच्या वेळी लॉर्ड कर्झन साहेबांनी याच कामाकरितां एक खाजगी फंड उभारण्यास सुरवात केली. पुढे दिल्ली दरवाराच्या तमाशांत साहेब गढून गेल्यामुळे गरीव प्रजेच्या संरक्षणाचे हे काम सहाजिकच मागे पडले होते; परंतु आतां ते त्यांनी पुनः हाती घेतले आहे. या कामी त्यांस यश येऊन आमच्या दुष्काळपीडित बांधवांचे संरक्षण व्हावें,असें आह्मी इच्छितों. शेवटी ज्या प्रभूच्या कृपेने हा छोटासा निबंध शेवटास गेला, तोच प्रभू आमांस या भयंकर दारिद्रयांतून सुटण्याचा मार्ग दाखवो,असें इच्छून ही सकारण लांबलेली प्रस्तावना पुरी करितो. महाड-कुलाबा, ता. २०।६।०५ पिणीम. गोविंद गोपाळ टिपणीस.