पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करून नाना प्रकारच्या युक्तयांनी आपल्या देशाची संपत्ति वाढविण्याकरितां झटतात, त्या देशांत लोकसंख्येची वृद्धि नाशास कारण न होतां उलट परिणामी हितच होते. - आमच्या देशांतील लोकांची परदेशगमनाकडे थोडथोडी प्रवृत्ति झाली आहे, परंतु ह्या विदेशगमनी लोकांपैकी बहुतेक सर्व केवळ मजूर असतात, ही मोठीशी समाधानाची गोष्ट नाही. लाखों मजूर दूरदेशी जातात आणि खर्चवेंच भागवून दहापांच वर्षांनी त्यांपैकी प्रत्येक हजार दोन हजार रुपये घेऊन परत येतो, यांत काही विशेष नाही. मॉरिशस बेटांत उसाची शेते आणि साखरेचे कारखाने यांमध्ये काम करण्याकरितां तीन लाख हिंदुस्थानांतले लोक आहेत. पण त्यांपैकी तिघांनी तरी येथे येऊन त्या प्रकारच्या उसाची लागवड केली आहे काय ? त्यांतल्या एकाने तरी येथल्या साखरेच्या कारखान्यांत राहून त्याला तिकडले वळण दिले आहे काय ? सध्यां मॉरिशस, नेटल, ट्रिनिडाड, सेन्ट ल्यूशिया, पॅनडा,सेंट व्हिन्सेंट, सेंट कीड्झ, ब्रिटिश, फ्रेंच, आणि डच ग्वायना, मार्टीनीक, माडागास्कर, ग्वाडेलुक, रीप्नियन, काईक्स बेट, मंबासा वगैरे अनेक ठिकाणी आमचे लोक जातात, परंतु त्यांपैकी शेकडा नव्याण्णव मजूर ! हे ठीक नाही. व्यापाराकरितां, धंदे शिकण्याकरितां आणि कलाकौशल्य शिकण्याकरितां परमलखांत गेले पाहिजे. शिकलेले काही लोक परमुलखांत अधिक शिक्षणाकरि