पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० आहे. पण या वस्तु कशा बनविल्या असतील असा मनाशींच प्रश्न करून तो सोडविण्याचा प्रयत्न आह्मी कधी केला आहे काय? केला असता तर आज पन्नास लाख रुपयांच्या छत्र्या, अडतीस लाखांच्या आगपेट्या आणि पंधरा लाखांची घड्याळे येथे कशाला आली असती ? आम्ही १ अब्ज १७ कोटींचा माल परदेशी पाठवितों परंतु त्यांत १२ कोटींचा देखील तयार केलेला नसतो. बहुतेक कच्चा ! आणि त्या कच्च्या मालामध्ये सुद्धा १५ कोटींचा चहा काफी, नीळ वगैरे परक्या देशच्या व्यापाऱ्याच्या कारखान्यांत परकी भांडवलाने उत्पन्न झालेला ! आयात व्यापार, चहा,सोने,रुपे वजा जातां परदेशांतून व्यायशी कोटींचा माल येतो. परंतु त्यांत कच्चा माल कायतो सरासरी पांच कोटींचा. अर्थात् । जे प्रमाण उद्योगांत तेंच संपत्तीत असणार ! हे रास्त नाही. आम्ही सर्वांनी उद्योगाची कास धरली पाहिजे. हे ब्रह्मदेव बाण्याचे दिवस नाहीत, विश्वकर्मा होण्याचे आहेत, हे तत्त्व आमच्यापैकी प्रत्येकाने लक्षांत बाळगले पाहिजे. हे लक्ष्यांत वागवून आमी उद्योगास लागलों, इ० स १८८० सालच्या रिपोर्टीत फ्यामिन कमिशनने सुचविल्याप्रमाणे आम्हांमध्ये उद्यमवैचित्र्याचा प्रादुर्भाव झाला, आणि आम्ही घरकोंबडेपणा सोडून औद्योगिक आणि यांत्रिक शिक्षणाकरितां परदेशगमन करूं लागलों, ह्मणजे आमची लोकसंख्या याच्या दुप्पट वेगाने जरी वाढली, तरी चिंता नाही. ज्या देशांत लोक उद्योगी असतात आणि हर प्रयत्न