पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुखांत कशी भर घालता येईल या विचारांत गुतले असून आमच्या इकडील शास्त्राचे धनी ( एम, ए.) आपल्यावरचा प्रोफेसर मरून त्यांची जागा आपणास कधी मिळेल या किंवा याच योग्यतेच्या दुसऱ्या विचारांत गुंतलेले आहेत. याची कारणे काहीही असतील परंतु ही वस्तुस्थिती आहे, व ती पार बदलली पाहिजे. नवीन नवीन वस्तु परक्या लोकांनी शोधून काढाव्या, आणि त्या आह्मी विकत घ्याव्या, उद्योग करून शोध लावून कारखाने घालून कोट्यावधि रुपये मिळविण्याचे काम परक्या देशांतील लोकांचे आणि आळसाने पडून आपल्याच शेजाऱ्याचा गळा कापून आली वस्तू विकत घेऊन देशांतल्या संपत्तीचा व्यय करण्याचे काम आमचें. हिंदुस्थान म्हणजे जगांतल्या देशाचा बाजार, सगळ्यांची उतार पेठ ! नुसती पोरांची खेळणी वीस लक्ष रुपयांची खपतात ! इतकी विद्या वाढली, इतकी शांतता मिळाली. इतकी परदेश गमनाची साधनें सुगम झाली, सर्व काही झाले. अगदी वाघ्याचा पाग्या झाला, पण आज शें दीडशे वर्षांत जो काही एककोट मागे लागला आहे, तो कांहीं सुटत नाही. मग काय आमची कायमची तळई उचलणार आहे की काय, कोणाला ठाऊक ? आम्ही उन्हाळा पावसाळा मिळून वर्षास दोन छत्र्या फाडतो आणि विड्या कुंकण्यांत दररोज एक काड्याची पेटी स्वपवतो. घड्याळ तर आमच्या जावई बापूंच्या देणगीतली एक अवश्य देणगीच होऊन बसली