पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकंदर सर्व ठिकाणच्या सांपत्तिक स्थितीच्या व लोकवस्तीच्या अवलोकनाने मैली ६४० पर्यंत लोकवस्ती झाल्यास चिंता नाही. आधिक झाली तर मात्र निभाव लागणार नाही, असे मान काढण्यात आले आहे. परंतु हिंदुस्थानांत पहावें तों मैली २३० लोकांचेही हाल होऊ लागले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करितां हिंदुस्थानांतील लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण इतर देशाच्या मानाने फारच कमी आहे; व ते योग्य मर्यादेबाहेर जाण्यासही अजून बराच अवकाश आहे, असे आढळून येईल. तेव्हां आतां असा प्रश्न उद्भवतो की, अशी स्थिति असतां आमांला वारंवार उपाशी मरण्याची पाळी कां येते ? याचे कारण आमच्या मते आम्ही सर्व शेतकीकडे थांव मारतों हेच आहे. आमच्यामधील शंभर लोक घेतले तर त्यांपैकी शेकडा ८६ शेतकीवर अवलंबून असतात; ६:८ सरकारी व खाजगी नोकरीवर निर्वाह करितात; आणि बाकी राहिलेले ७.२ मात्र व्यापार व किरकोळ हुन्नरावर उपजीविका चालवितात. हे प्रमाण, इतर आज सुखी असलेल्या, सृष्टिप्रकोप होऊन पावसाने दगा दिला तरी मोठ्या हिमतीने आनंदात दिवस काढणाऱ्या सर्व जगाचा व्यापार आक्रमून बसलेल्य' इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे देशांत अगदी उलट आहे. या दशाताल शास्त्रज्ञ पंडित परमेश्वराच्या अष्टधा प्रकृतींची यूर्णपणे ओळख करून घेऊन त्यापासून जीव मात्राच्या