पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देशांच्या लोकसंख्येच्या वाढीची हिंदुस्थानांतील लोकसंख्येच्या वाढीशी तुलना केली आहे-ती वरून पाहतां हिंदुस्थानाचा नंबर विसावा लागतो. अमेरिका व यूरोपखंडांतील निरनिराळे एकोणीस देश आमच्यावरती आहेत. या सर्व देशांची सांपत्तिक स्थिति आमच्या देशापेक्षा अनेकपट चांगली आहे; या सर्व देशांस आपआपल्या संततीचा भार वाहण्याचे सामर्थ्य असून आम्हीच ज्या अर्थी असमर्थ बनलो आहोत, या देशांतील लोकसंख्येची वाढ आमच्यापेक्षा अधिक झपाट्याने होत असतां यांना कधी दुष्काळाची पीडा होत नाही, आमच्या मात्र ती जर अगदी तिसऱ्याच वर्षी येऊन बोकांडीच बसते. तर त्यांतलें इंगित काही निराळेच असले पाहिजे. लोकसंख्येची वाढ हे जर दुष्काळाचे कारण असते, तर अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांत, खुद्द इंग्लंडांत किंवा बाकी राहिलेल्या आणखी १७ देशांत पाऊस पाण्यात थोडी चलबिचल होतांच आमच्या येथल्या पेक्षा दुष्काळ वारंवार आले असते. परंतु असे होत नाही. देशाच्या विस्ताराशी लोकसंख्येचे प्रमाण पाहिले तरीही असेच आहे. तसा इंग्लंडचा पहिला नंबर येतो. इंग्लंडास दर मैली ४९८ वस्ती आणि हिंदुस्थानांत २३० ह्मणजे येथल्या दुप्पट गर्दी करून इंग्लंडांतील लोकांस रहावे लागते. सरासरीने आमच्या इकडच्या प्रत्येक माणसास इंग्लं. डांतील प्रत्येक मनुष्याच्या दुप्पट जागा मिळते, तथापि दुप्काळाचे बळी आम्हींच!