पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तरी आपलें अप्रतिबद्ध व्यापाऱ्याचे तत्त्व थोडे बाजूला सारून, मनुष्यांचे आणि जनावरांचे अन्न बाहेर पाठविण्याची सक्तीनें मनाई करावी. मुंबईच्या लोकांनी सन १८९९ च्या आक्टोबर महिन्यांत इंडिया सरकाराकडे पाठविलेल्या अर्जात ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांत या आशयाची एक मागणी असून ती अगदी योग्य आहे असें आह्मांला वाटते. नववे कारण पावसाने दगा दिला ह्मणून दुष्काळ पडतो हे म्हणणे जसें वर वर पाहणारास खरे दिसते,तसेंच तो लोकसंख्येच्या वाढीने पडतो, हे म्हणणेही सकृद्दर्शनी खरे भासते. पाऊस आणि टोळांच्या वगैरे धाडी ही जशी अनिवार्य कारणे आहेत. ती जशी टाळतां येणें आपल्या हातचे नाही,तशी लोकसंख्येची वृद्धिही पण बहुतेक अनिवार्यच आहे. एखाद्या वर्षाच्या पावसाच्या दग्याने किंवा तशाच एखाद्या टोळधाडीसारख्या अरिष्टाने ज्या देशाला आपला निभाव काढता येत नाही त्या देशाच्या अंतर्व्यवस्थेत काहीतरी घोंटाळा असला पाहिजे असा सिद्धांत काढण्यास जशी हरकत नाही, तशीच लोकसंख्येची वाढ बेताची असतां ज्या देशास आपला निभाव लावतां नाही, त्या देशाची अंतर्व्यवस्थाही बिघडलेलीच असली पाहिजे, अस सिद्धांत काढण्यासही पण हरकत नाही, असे आम्हांस वाटते. गेल्या खानेसुमारीवरील युख्य अधिकारी मि.बेन्स यांनी आपल्या रिपोर्टाच्या ७३ व्या पानावर जगांतील पुष्कळ