पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिल्या प्रकारच्या जमीनीची वाढ शंकडा बाराप्रमाणे होत असून दुसरीची वाढ शेकडा ८१ पेक्षा अधिक होत आहे. यावरून शेतकऱ्याचे लक्ष्य धान्यापेक्षा धान्येतर जिन्नस उत्पन्न करण्याकडे विशेष लागले आहे असे दिसते. याचे कारण परदेशचे व्यापारी अशा मालास चांगली किंमत देतात हेच होय. असो. आमच्या इकडे दुष्काळाच्या इतर काहीं कारणांचा अभाव असतां, जी कारणे प्रजेच्या व सरकारच्या हयगईमुळे उत्पन्न होऊन देशांवर वारंवार दुष्काळाचे हल्ले होत आहेत, ती कारणे उभयतांच्या प्रयत्नांनी जर नाहींशी झाली असती, तर देशांत यापेक्षा कमी धान्य उत्पन्न झाले असते, देशांतून यापेक्षा जास्त धान्य परदेशी व्यापाराकरितां रवाना झाले असते, आणि धान्येतर जिन्नस उत्पन्न करण्याकडे लोकांनी आपले लक्ष्य यापेक्षाही जास्त लावले असते, तरी आम्हांला भिण्याचे कारण नव्हते. इंग्लंड देशांत चांगले पीक आले, तरी स्थानिक धान्याचा पुरवठा चार महिन्या पुरताही नसतो, असें असून तेथे दुष्काळ कधी पडत नाही. अमेरिका, हिंदुस्थान वगैरे ठिकाणांहून गेलेल्या धान्यावर त्यांचे आठ महिने लोटतात. परंतु इतर कारणें नाहींशी होण्याची व्यवस्था होण्यास बराच काळ लागेल, ह्मणून चालू कारणांपुरताच विचार करितां असे वाटते की, लोक जर सध्यांसारख्या खडतर प्रसंगी आपला अन्नसंग्रह बाहेर देशी पाठविण्याचे बंद करणार नाहीत, तर सरकारांनी निदान अशा भयंकर वेळे पुरत