पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अवश्य लागणाऱ्या धान्यांतसुद्धां सुबत्तेच्या वर्षी २९ लक्ष टनाची तूट असते. अर्थात् आमच्या एक कोट लोकांस पाऊसपाणी पडून चांगले पीकं आलें तरी देशांत मुळीच धान्य राहत नाही. ही फार शोचनीय स्थिति आहे ! पाऊस पाणी बरेलागले, तरी एक कोटी लोकांस धान्याचा ताटा येतो. मग सन १८९९ सारख्या आपत्तीच्या सालांत काय अवस्था होत असेल ? अशा सालांत धान्य बाहेर जाऊन शिवाय कित्येक जमीनी अगदी ओसाड राहतात, आणि लागवड जमीनीत पीक नेहमीपेक्षा फार कमी येते. गव्हाच्या पिकासंबंधाने फक्त मुंबई इलाख्याचीच स्थिति पाहिली, तर सन १८९९ चा सरकारी अंदाज १२९०० टन गहूं येतील असा होता. ही संख्या सव १८९८ सालच्या आणि मुंबई इलाख्याच्या उत्पन्नाच्या सरासरीच्या आहे. फक्त ऑलबाग तालुक्यांत इ. स. १८९६१९७ च्या काळांत खारे भात पिकणारी जमीन ओसाड राहिल्याचे प्रसिद्ध झाले होते. असाच प्रकार दुष्काळग्रस्त प्रांतांत असावयाचा. यावर अशी शंका निघेल की, लागवड जमीनीची वाढ जर झपाट्याने होत आहे,तर तीस लाख टन उत्पन्न ते कायः ते तेव्हांच भरून निघेल. एकादे समयीं जमीन ओसाड राहिली म्हणून काय झाले ? शंका बरोबर आहे. परंतु लाग वड जमीनीत दोन भेद आहेत. एक धान्य उत्पन्न होणारा जमीन आणि दुसरी कापूस, ताग, नळि, अफू.तंबाखू,चहा, कॉफी वगैरे धान्येतर जिन्नस उत्पन्न होणारी जमीन. प.