पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गरीबांसच माल द्यावा. असे केल्याने या आगगाड्यादी व्यापारसाधनांचा दुष्काळपीडितांस इच्छित उपयोग होईल. आठवें कारण--सर जेम्स केअर्ड यांनी ता. ३१ आक्टोबर स. १८७९ रोजी स्टेट सेक्रेटरी साहेबांकडे जो आपल्या कामाचा सरकारी रिपोर्ट पाठविला, त्यांत ते ह्मणतातः " सामान्य वर्षातले जरी उत्पन्न घेतले तरी ते हिंदुस्थानांतील सांप्रतच्या लोकसंख्येस पुरण्यासारखे नाही. मग शिलकेची गोष्ट कशाला? यामुळेच अलीकडे महागाई होतांच दुष्काळ पडूं लागले आहेत." __ हा लेख त्यांनी वीस वर्षांपूर्वी लिहिला होता. या वोस वर्षांत आमच्या लोकसंख्येत पांच कोटींची भर पडली ६ आहे. अलीकडचे आंकडे घेऊन इ. स. १८९६ साली चम्पियनकारांनी हिंदुस्थानची लोकसंख्या आणि जमिनीचे उत्पन्न याची तुलना केली आहे. ते ह्मणतातः-"ब्रिटिश हिंदुस्थानची लोकसंख्या २२ कोटी आहे. आतां दर माणशी सरासरीने दररोज दीड पौंड धान्य लागते, असें मानल्यास इतक्या लोकांस ५.८० कोटी टन धान्य पाहिजे. आतां दर एकरास सरासरी उत्पन्न ६९४ पौंड होते. या हिशेबाने पाहतां धान्याच्या लागवडीस असलेल्या १८.६० कोटी एकर जमिनीत ५.७६ कोटी टन धान्य होईल, ह्मणजे आपल्या देशांत चांगला पाऊस असला तरी दरसाल चार लक्ष टन धान्य खपापेक्षा कमी उत्पन्न होईल. असे असून आपण वीस लक्ष टन परदेशी रवाना करितो. ह्मणजे आमांस