पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रेदी करण्याचं सामर्थ्य नसल्याने दुष्काळाची पीडा होणारच. आमचा दुष्काळ सध्यां या स्वरूपाचा आहे. एकंदर प्रजा सुखी झाल्याने दुष्काळ टळतीलच; परंतु सध्यांच्या कारणांपुरतांच विचार करितां, सरकारांस एक सूचना करावीशी वाटते. देशांतील ज्या भागांत धान्य उत्पन्न होते त्या भागावर, धान्याच्या खरेदीकरितां दुष्काळ पीडित प्रदेशांतील सर्व व्यापारी लोकांच्या उड्या पडतात. यामुळे त्यांची मूळ खरेदी महागाईची होते आणि त्या किंमतीवर भाखंच व व्यापाऱ्यांचा नफा वगैरे बसून ते धान्य दुष्काळग्रस्त जाग्यावर अत्यंत महाग दराने विकलें जाते. आधींच जवळ पैसा नसतो, आणि त्यांत अशी महागाई. त्यामुळे गरीब बिचारे लोक अर्धपोटी राहतात, किंवा उपासाने मरतात. याकरितां अशा भयंकर सालांत व्यापारी । लोकांस आगगाड्या, आगबोटी वगैरे दळणवळणाच्या साधनांचा उपयोग धान्य नेण्याआणण्याकरितां फुकट करूं द्यावा. ह्मणजे तितकें स्वस्त धान्य विकण्यास त्यांना सवड होईल. सध्या एकामागून एक रेलवे कंपन्यांची मालकी सरकारांकडे येत आहे, तेव्हां हे करणे त्यांस फार जड जाणार नाही. या संबंधांत आमच्यापैकी पैसेवाल्या लोकांसही एक सूचना करण्यासारखी दिसते. ती अशी की, त्यांनी वर्गणी करून प्रत्येक दुष्काळपीडित शहरांत एक तरी स्वस्त दराने धान्य विकण्याचे दुकान काढावें; आणि तेथे फक्त