पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) क्षिण आफ्रिकेंत आमच्या लोकांचा फार छळ होऊ लागला आहे. यासंबंधाने ता. २० मे १९०३ रोजी सर भावनगरी यांनी हौस ऑफ कॉमन्स सभेत विचारलेले प्रश्न व गेल्या राष्ट्रीय सभेच्या वेळी आफ्रिकेंतून मुद्दाम येऊन मि. मदनाजित यांनी केलेले भाषण लक्ष्यात घेतले असतां तेथें आमांसंबंधाने घडत असलेली कृत्ये इंग्रजांच्या इभ्रतीस काळिमा लावण्यासारखी आहेत, असें ह्मणावे लागते. हिंदुस्थानांतील शेतकऱ्यांचे दैन्य अंशतः दूर करण्या. च्या हेतूने १९०४ सालीं नवीन पेढ्या काढण्याविषयी सर. कारी ठराव झाला असून त्या कामीं कांहीं बिनव्याजी भांडवलही सरकार देणार आहे. शिवाय या व्यवहारास स्टँप व रेजिस्ट्रेशन आणि इनकमटॅक्स यांची सूट मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे कैवारी आतां कोण पुढे सरतात ते पहाणे आहे. मिठावरील कर दोन वेळा मिळून मणी एक रुपया कमी करण्यांत आला,ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. बोअर युद्धाशी आणि तिबेट मिशनशी आमचा अर्थाअर्थी संबंध नसतां दोन्ही लढायांच्या स्वर्चाकरितां आमी भागीदार झालो आणि तिबेटच्या शांततेच्या मिशनांत आमचे बरेच सैनिक प्राणास मुकले. आमच्या लष्करी खर्चास तर धरबंधच राहिला नाही; आणि आतां कमँडर इन् चीफ साहेबांस व्हाइसरॉय साहेबांवर जो विजय मिळाला, त्यामुळे तर हा खर्च कोणीकडे राहील याचा नेमच राहिला नाही. गुदस्त सालीं अंदाजापेक्षां एक कोट ऐशी लक्ष रुपये अधिक खर्च झाले व यापुढे दरसाल तीन कोटी रुपये खर्च जास्त देण्यात येण्याचे ठरले आहे. नोकरीसंबंधानें