पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लावर तार पसरली असून मुंबई आणि कलकत्ता येथील व्यापारी एका चौदाशे मैल लांबीच्या विस्तीर्ण दिवाणखान्यांत बसून एकमेकांशी बोलू लागले आहेत. मुंबईला तांदूळ कमी असले तर ते रंगूनहून सातव्या आठव्या दिवशी येऊन पोहचतात. अमेरिकेंतून ते येण्यास फार तर एक महिना लागतो. गेल्या दुष्काळांत अमेरिका आणि रशिया देशांतून अशा प्रकाराने धान्य आल्याचे वाचकांस आठ. वतच असेल. अमेरिकन मिशनरी लोकांच्या खटपटीने दुष्काळग्रस्तांस मदत ह्मणून एक धान्याची बोट सन १८९९ सालीही आली होती. रंगूनच्या गोणांनी त्या घेळी आमचे केवढें कार्य केले हे कोणालाही सांगितले पाहिजे असे नाही. - सारांश, आमच्या देशांत दळणवळणाच्या साधनाची पंचाईत नाही. खंडो गणती माल आठचार दिवसांच्या अवधींत देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे नेता येतो. इ. स. १८९८ च्या फ्यामिन कमिशनच्या रिपोटीत दुष्काळाच्या कामाला जरूर तितका आगगाडीचा रस्ता तयार आहे, असे स्पष्ट झटलें आहे. इ. स. १८७७ सालच्या दुष्काळापासून आजपर्यंत दहा हजार मैल आगगाडीचा रस्ता जास्त झाला. परंतु सन १८९९ च्या दुष्काळाचें स्वरूप आणि विस्तार सदर दुष्काळांपेक्षा किंचित्ही लहान नसून उलट अत्यंत अवाढव्यच आहे. ह्या एका गोष्टी वरूनच पाहतां असें ठरतें कीं, जरी पीक आलेल्या प्रदेशांतून दुष्काळ पीडित भागांत धान्य नेले, तरी लोकांमध्ये ते ख