पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० झाल्यास पार्लमेंटचे पहिले हिंदु ( हिंदुस्थानांत राहणारे) सभासद ना. दादाभाई ह्मणतात त्याप्रमाणे इंग्लंडचा सर्व जगाशी होणारा व्यापार एकट्या हिंदुस्थानाशी होऊ लागेल, आणि सरकारच्या इतर करांपासून होणाऱ्या उत्पन्नांत पुकळ भर पडेल. सातवें कारण-ज्या देशांत, देशाच्या काही भागांत उत्पन्न झालेलें, अथवा देशांत उत्पन्न झाले नसेल तर परदेशांतलें, धान्य विकत घेण्यास लोकांजवळ पैसा असतो परंतु ते आणण्याची साधने नसतात, त्या देशांत दुष्काळ पडतो, असें आह्मीं सातव्या कारणांत सांगितले आहे. परंतु आमच्या देशाची स्थिति याच्या अगदी उलट आहे. येथे देशांतल्या निरनिराळ्या प्रांतांशी व बाहेरच्या देशांशी दळणवळण ठेवण्याची अनेक साधनें प्रचलित असून, त्यांची वाढ मोठ्या झपाट्याने होत आहे. इ. स. १८५३ साली दलहौसी साहेबांच्या कारकिर्दीत आगगाडीचा रस्ता प्रथम मुंबईपासून ठाण्यापर्यंत तयार झाला. आणि आज अर्धशतकांत तो तेवीस हजार मैलांवर पसरला आहे. व्यापाराचे दुसरे साधन ज्या आगबोटी त्या चालविणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढत असून, पूर्वीचा एका वर्षांचा प्रवास आतां एका महिन्यावर आला आहे. लंडनचे टपाल सध्यां आमा.. ला दोन आठवड्यांत मिळते. व्यापाराचे तिसरे साधन तारायंत्र, याचे हिंदुस्थानांतील उत्पादकत्वही दलहौसी साहेबांकडेच आहे. गेल्या पन्नास वर्षात अजमासे दीड लस मै