पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगून आणि सर्व हिंदुस्थानभर बंगाल्याप्रमाणे कायम धान्याची पद्धति सुरू करा, असे त्यांस विनवून प्रजा आपलें या संबंधाचे कर्तव्य करीतच आहे. ____ऐन जिनसी सारा घेण्याची पद्धत मोडल्यामुळे प्रजेच फार नुकसान झाले आहे. पूर्वीचा पिकाचा अमका हिस्सा सरकारांत द्यावयाचा असा ठराव असल्यामुळे ज्या वर्षी पीक चांगले येई, त्या वर्षी सरकारास पुष्कळ गल्ला मिळे, आणि जेव्हां पीक वाईट येई, तेव्हां प्रजेला कमी सारा भरावा लागे, तो प्रकार मोडला आणि आपत्तीच्या वर्षीदेखील प्रजेवर जबर सरकार बोजा. बसला ही पद्धत अमलांत येणे शक्य नसेल, तर या संबंधांत सरकारचे कर्तव्य ह्मणजे,ना. पारख म्हणतात त्याप्रमाणे एक कमिशन नेमून, फाजील झालेला सारा कमी करून, त्याचे मान एकंदर उत्पन्नाच्या १ वर आणून बसवावं. आणि मग हे दर सर्व हिंदुस्थानाकरितां कायमचे करावे. एकवार तीस वर्षांची मुदत दिली असतां त्याच्या पूर्वीच पाहणी करून सारे वाढविणे ह्मणजे अगदी अन्याय आहे ! जमीन ओसाड राहील तर आपली खात्री करून घेऊन तेवढा आकार कमी घ्यावा, हे न्यायाचे आहे. उत्पन्नाचा धारा घ्यावयाचे ठरवून कायम धाऱ्याची पद्धत सुरू केल्याने, ओसाड जमिनीवर आकार न घेतल्याने, काळीच्या वसुलांत थोडी तूट येईल खरी, तथापि "प्रजेचे हित तेच आपले हित' असे मानणाऱ्या सरकारांनी त्याबद्दल खेद करण्याचे काही कारण नाही. प्रजा सुखी