पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • या सर्व विवेचनावरून सरकारचे जमीन महसुलाचे नियम किती अन्यायाचे व जुलमाचे आहेत, आणि त्यामुळे प्रत्येक सर्वे ह्मणजे चरकाचा एक फेरा होऊन त्या फेऱ्यांत रयत कशी पिळून निघत आहे, हे वाचकांच्या लक्ष्यांत येईलच. आतां अशा पिळून निघालेल्या रयतेचे सर्वस्व ह्मणजे जे जमिनीतील पीक, त्याला दगा पोहचला ह्मणजे ती भया भया करते, अन्नासाठी दशदिशा फिरते आणि शेवटी 'किती अंतपाहशी देवा' असें ह्मणून आकाशाकडे नजर देऊन प्राण सोडते. हा या फाजील साऱ्याच्या पद्धतीचा भयंकर परिणाम आहे. शेकडा ऐशी लोकांचे उत्पन्न काय ते जमिनींतील पीक होय. त्याला जर धक्का पोहोचला, आणि जे थोड़े से बहुत पदरांत पडावयाचें तें घरांतील माल मिळकतीसह सरकार साऱ्याकरितां सरकारच्या भरीला घातले, तर मग या लोकांनी काय करावें ! त्यांनी दुष्काळाला आपले प्राण बळी द्यावे, नाही तर काय करावे ? - असो. याप्रमाणे आमच्या हिंदुस्थानांत दुष्काळ पडण्याला ही फाजील धान्याची पद्धत कशी कारण होते, हे आमी दाखविले. पंधराव्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष सर रोमे शचंद्र दत्त यांनी आपल्या पहिल्या दिवशींच्या भाषणांत हीच गोष्ट सांगितली आहे. - या कारणाच्या निवारणाचे सर्व उपाय राज्यकर्त्यांनी करावयाचे आहेत. इ. स. १८८५ सालापासून आज पा वेतों प्रत्येक राष्ट्रीय सभेच्या द्वारे सरकारास आपले गा-हाणे