पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशी आशा वाटते, तरी पुष्कळ जमिनी शेतकऱ्यांकडून निघून सावकारांच्या घरांत चालल्या आहेत." स्टेट सेक्रेटरी साहेब म्हणतातः “फक्त मद्रास इलाख्यांत १८८७ पासून १८९४ पर्यंतच्या सात वर्षांत सरकार देण्याबद्दल ५६,६४८ लोकांची जमीन विकली; आणि ५५,७७२ लोकांची जंगम मिळकत विकली. यापुढील दोन वर्षांत वरील. कारणांकरितांच १४४११ लोकांची जमिन आणि ६७१७ लोकांचा जंगम माल विकण्यांत आला. हाच प्रकार मध्य प्रांत, वायव्येकडील प्रांत वगैरे बंगाल्यावांचून सर्व ठिकाणी दिसण्यांत येतो. गुजराथेसंबंधाने ना० पारख यांनी आपल्या सातारा येथील भाषणांत दिलेले आंकडे याच मासल्याचे आहेत. इ. स. १८९६।९७ पासूनच्या तीन वर्षांत तीन जिल्ह्यांत ६३,६०१ एकर जमीन लोकांनी धारा सोसेना ह्मणून सरकारच्या स्वाधीन केली. मा कांहीं जिराईत जमिनी बागाईत व कांहीं वरकस जमिनी खरीपी होण्यासारख्या आहेत व काही शेतकी खात्याचे सेक्रेटरी रामसाहेब ह्मणतात त्याप्रमाणे खत वगैरे घातल्यास पुष्कळ अधिक पीक येण्यासारख्या आहेत. परंतु सरकार धारा वाढवील आणि मग तो आपल्याच्याने देव. वणार नाही या भीतीने कोणी तसे करीत नाही. बंगाल्यांतील प्रकार याच्या अगदी उलट आहे. हल्ली तेथें पीक होण्यासारख्या जमिनीचा भागही शेते पाडल्यावाचून राहिलेला नाही. TE