पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर जेथले शेतकरी अगदीच भुके बंगाल बनतात, तेथें दुकाळांची वाण कोठून असणार ? - असो. साऱ्याच्या या विलक्षण वाढीचा परिणाम असा झाला आहे की, बंगाल्याशिवाय बाकीच्या सर्व प्रांतांतील अन्नास मोताद झालेले शेतकरी, ओसाड जमीनीवरही भर आकार द्यावा लागल्यामुळे दरसाल जमीनीत ज्याची बाजारांत जास्त किंमत येईल असें पकि करूं लागले; आणि ह्मणून त्यांची जमीन निःसत्व बनत चालली. धारा भरण्याचे सामर्थ्य नाही, ह्मणून कित्येकांच्या जमिनींचा लिलाव झाला आणि धारा फाजील म्हणून कित्येकांनी आपण होऊनच जमिनी सरकारच्या स्वाधीन केल्या. इ. स. १८७२ च्या औंध रेव्हेन्युरिपोर्टात मटले आहे की, “ लहानसहान खेड्यांपैकी असे एकही खेडें नाही की, जेथल्या जमीनदारांला कर्ज नाही. आणि अ-- शी एकही जमीन नाही की, जिच्यावर सावकाराचा बोजा नाही; आणि मी असें खात्रीपूर्वक सांगतो की, या लोकांपैकी प्रत्येकाचे कर्ज-निदान त्याचा काही अंश तरी–धारा लावण्याकरितां काढलेलें आहे." इ. स. १८७९ साली दक्षिणेतील शेतकऱ्यांस ऋणमुक्त करण्याचा कायदा पास झाला. पुढे त्याचा परिणाम कसा काय झाला आहे, याची चौकशी करण्याकरितां इ. स. १८९२ साली एक कमिशन नेमले. त्याने असा रिपोर्ट केला की, " जरी या कायद्याने शेतकऱ्यांची स्थिति सुधारेल.