पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्पन्न वाढविण्याकडेसच त्यांचे विशेष लक्ष्य असते, हे होय. या लोकांनी रोव्हिन्यू खात्याचे जनक सर वुइंगेट साहेब यांचा बोध लक्ष्यात ठेवल्यास पुष्कळ फायदा होईल. हे साहेब ह्मणतातः " चुकून सारा जरी अतिशय कमी बसला तरी देशाचे नुकसान होत नाही; परंतु दुसरे दिशेस जर चूक झाली व सारा जरब बसला, तर मात्र देशाची धूळधाण होते.” एकदां लॉर्ड कार्नवालिस साहेब एका सर्वे कामगारास म्हणाले: “हे पहा, धाऱ्याची आकारणी कमी कर, नाही तर मी तुझा शत्रू होईन." ही गोष्ट जमीन बाब वाढविणारांनी चांगली लक्ष्यांत वागवावी. - सर बार्टल फियर यांनी मुंबईइलाख्यांतील धाऱ्यासंबधाने जमीनीचे वर्ग ( १ ) मनास वाटेल तो धारा बसविलेली जमीन, (२) ज्या जमीनीचा धारा दिल्यावर शेतकऱ्यास फक्त त्याच्या भांडवलाचे व्याज आणि मजुरीच राहते अशी जमीन, व(३)ज्या जमीनीत जेमतेम धाऱ्यापुरतें उत्पन्न निघतें अशी जमनि, असे तीन वर्ग केले. सर लुइ मॅलेटने आणखी ज्या जमिनीत कसेतरी खर्चापुरतें उत्पन्न निघतें, असा चौथा वर्ग केला व त्यास सर वुइल्यम वेडरबर्न साहेबांनी " ज्या जमीनीच्या पिकाने लागवडीचा खर्च भागत नाहीं; आणि म्हणून तिचा धारा दुसरीकडे मिळविलेल्या मजुरीवर किंवा सावकाराकडून काढलेल्या कर्जावर भागविला जातो, अशी जमीन" हा पांचवा वर्ग जोडून हे वर्गीकरणाचे काम पुरे केले. अशा प्रकारे धारा भरल्या