पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रु. ३ आ. १२ पै ६, आणि रु. ८ आ. १ पै २ असें आहे, म्हणून सांगितले. हे प्रमाण खरोखरच अत्यंत जबर आहे, असें कोणाही विचारी मनुष्यास वाटल्यावांचून राहणार नाही. इ. स. १८७५ पासून १८९५ पर्यंत वीस वर्षाची स्थिति पाहिली, तर बंगाल्यांत जमीनदारांनी शंकडा सत्रा टक्के कुळावर जास्त आकारणी केली आहे, या आकारणीचे मान दर सात वर्षास शेकडा सहा पडते. तेच पंजाबांत १२, मध्यप्रांतांत १५ आणि वायव्येकडील प्रांतांत ४८ याप्रमाणे पडते. बाबू वैकुंठनाथ सेन यांनी थोड्या दिवसांमागें प्रसिद्ध केलेल्या आंकड्यांवरून असे दिसते की, बंगाल्यांतील शंभर लोकांस ५५ रुपये धारा आहे, पंजाबांत १०९ वायव्ये कडील प्रांतांत १२९, मद्रासेंत १३४ आणि मुंबई इलाख्यांत शंभर लोकांस २३४ रुपये जमीनधारा दरसाल भरावा लागतो. .. __ असो. याप्रमाणे ज्या ठिकाणी कायम धान्याची पद्धत नाही, त्या ठिकाणी सारे वाढण्याची दिवसेंदिवस अगदी कमाल होऊन गेली आहे. बहुतेक प्रांतांतून निव्वळ उत्पनाचा निम्मे धारा घेण्याचा ठराव आहे. परंतु चूक एकंदर उत्पन्नांतून खर्च वजा करितांनाच होते. हा खर्च दर एकरास सरासरीने सहा धरतात. याचे कारण कर आकारणारांस जमिनीची लागवड करण्यास येणाऱ्या खर्चाचा अंदाज नसतो, आणि लोकांच्या अडचणी पाहण्यापेक्षा सरकारचे