पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५३ . पुढे तीस वर्षांनंतर तरी आपले हे नाटक आनंदपर्यवसायी होईल, असें बिचाऱ्यांस वाटत होते; तो मध्यप्रांतांतील रायपूर आणि विलासपूर परगण्यांत त्याचा दुसरा अंक सुरू झाला. आणि सदर नाटकाचे एक एक दुःखपर्यवसायी देखावे नजरेपुढे येऊ लागले. रायपुरांत पहिल्या साऱ्यावर शेकडा ७४ वाढ झाली. आणि विलासपुरांत, मोठ्या खेदाची गोष्ट की, ती वाढ शेकडा नव्वद झाली. आणि लोकांनी सभा केल्या, अर्ज केले, कमिशनर साहेबांपुढे येऊन आपली गा-हाणी गाईली, सर्व कांहीं केलें, परंतु व्यर्थ ! आमच्या स्टेट सेक्रेटरी साहेबांनी दिलेल्या माहितीवरून असे कळते की, इ. स. १८८३।८४ साली या प्रांताचा जमीनधारा ६२ लक्ष होता तो इ. स. १८९६ साली ७६९ लक्ष झाला; व ही वाढ लौकरच शेकडा ५० होईल असा अदमास आहे. सन १८९९ च्या दुष्काळाने अत्यंत पिडलेला दुसरा प्रांत गुजराथ. धान्याच्या संबंधाने तेथील स्थितिही अशीच भयंकर आहे. एकवेळ असलेल्या मुंबई प्रांतिक सभेचे अध्यक्ष नामदार पारख यांनी आपल्या भाषणांत या प्रांतांत धान्याच्या वाढीमुळे झालेल्या अनर्थांचे वर्णन फारच हदयद्रावक रीतीनें केले आहे. अमदाबाद, केरा व भडोच ह्या तीन जिल्ह्यांमध्ये अनुक्रमें रु. २ आ. ११ पै १, रु. ५ आ. ० पै. ७, रु. ५ आ. १ पै ६ दर एकरास धारा आहे; आणि मा गशी या धाऱ्याचे प्रमाण अनुक्रमें रु. ३ आ. ७ पै ८,