पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक उपयोग होणार नाही, असे सर रोमेशचंद्र दत्तांचे मत आहे. या मुंबई इलाख्याची जमीनमहसुलपद्धति अशीच दोषपूर्ण आहे. इ. स. १८६५।६६ साली जी सर्व्ह झाली, ती मध्येच लोकांवर फार कडक सारे बसल्याबद्दलचे सहें कमिशनरांचे व काही जिल्ह्यांच्या त्या वेळच्या कलेक्टरांचे मत असतां, इ. स. १८९४।९५ च्या नवीन सव्र्हेत कियेक ठिकाणी धान्याची वाढ शेकडा ७५ या प्रमाणांत झाली आहे. असो, आता इ. स. १८९७ च्या व इ. स. १८९९ च्या दुष्काळाचा चिमटा जेथे जास्त जोराने बसला आहे, त्या मध्यप्रांताकडे वळू. माननीय हिंदु प्रजाजनांची अत्यंत कळकळ बाळगणाऱ्या लॉर्डडलहौसी साहेबांनी हिंदु अमलांत प्रजेला फार त्रास होतो ह्मणून आपल्या कारकिर्दीत जे प्रदेश ब्रिटिश राज्यव्यवस्थेखाली आणले, त्यांपैकींच नागपूरच्या भोसल्यांचे राज्य होय. हे इ. स. १८५३ साली आमच्या सुखदुःखाचे वांटेकरी झाले. पहिली सुधारणा म्हणून लॉर्ड कॅनिंग साहेबांनी येथे आपली व्हिन्युपद्धत सुरू केली. आणि इ. स. १८६२ साली भोसल्यांच्या प्रजेच्या दैवदुर्विलासाच्या नाटकाचा ड्रापसीन उघडला, व लॉर्ड साहेबांनी जरी निव्वळ उत्प-नाच्या निम्मेपेक्षा अधिक सारा घेऊ नये,असा निर्बध ठर विला होता, तरी तो बाजूला ठेवून सर्व्हे खात्यानी निव्वळ र उत्पन्नाच्या जवळ जवळ पाऊणपट आकारणी केली!