पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केला आहे,तसाच केला पाहिजे.गेल्या कांग्रेसला जोडून मुंबईस जे शेतकीचे प्रदर्शन भरण्यांत आले होते, ते पहाण्याकरितां बऱ्याच शेतकरी लोकांस आपल्या खर्चाने नेऊन तेथे त्यांस कांहीं सप्रयोग शिक्षणहि दिले. सरकारचे हे कृत्य अभिनंदनीय आहे, असे आम्हांस वाटते. ___ जमीनमहसुलाच्या नियमांत अलीकडे काही सुधारणा नाही. दरसाल हैं उत्पन्न सारखं वाढत चालले आहे.अमात्य दत्त साहेब यांच्या सूचनेवरून आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे ऐन जिनशी सारा वसूल करण्याचा अनुभव जसा श्री. सयाजी महाराज आपल्या राज्यांत पहाणार आहेत, तसा प्रयत्न आमच्या सरकाराने करून पाहिल्यास वावगै नाही. परंतु जें सरकार आम्ही केवळ धारा वाढवण्याकरितांच सर्वे करतो' असें ह्मणते, त्यांच्या हातून हे कसे होणार ! कलकत्त्यास गुदस्त साली एक 'शास्त्रीय आणि औद्योगिक शिक्षणोत्तेजक सभा,' नांवाची मंडळी निघाली असून तिच्या फंडांतून दरसाल काही विद्यार्थी युरोप, अमेरिका व जपान येथे पाठविण्यात येणार आहेत. कांहीं जातींनीही असेच फंड उभारून परदेशी विद्यार्थी पाठविण्याचा उपक्रम केला आहे. या गोष्टी खरोखरच फार समाधानकारक आहेत. तसेच परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यास झैसूरचे दिवाण कृष्णमूर्ति यांनी शास्त्राधार दाखवून पावन करून घेतले व शारदामठाधिपति श्री. जगद्गुरू शंकराचार्य यांनी अल्पस्वल्प प्रायःश्चित्ताने असे लोक खुशाल पावन करून घ्यावे,असा निर्णय दिला आहे. यामुळे परदेशगमन करणारांविषयी यापुढे तरी आमच्या हातून अनुदार वतेन घडणार नाही,अशी आह्मी आशा करतो. अलीकडे द