पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भयंकर हाहाःकार उडाला होता. व सालमजकुरीही तसाच संभव दिसत आहे. braina ओरिसा प्रांतांत ही साऱ्याची पद्धत नाही; म्हणून तेथे पिकानें गोता दिला की, आमच्या इकडच्या प्रमाणेच लोकांचा चुराडा उडतो. इ. स. १८६५/६६ सालच्या दुष्काळांत या प्रांतांत लाखों लोक दुष्काळाला बळी पडले. का वायव्येकडील प्रांताची स्थिति याच्या खालोखाल आहे. तेथे शेतकऱ्यांस जमिनीच्या उत्पन्नाचा जमीनदारांना द्यावा लागतो. परंतु तेथे दर तीस वर्षांनी हे मान वाढत चालले आहे. त्यामुळे काही दिवसांनी तिकडील शेतकरीही दुष्काळाला टक्कर देण्यास असमर्थ बनण्याची भीति वाटते. सन १८९९ च्या दुष्काळाचे तेथे अगदी सौम्य स्वरूप पसरण्याचे कारण तरी हेच आहे. र सर थॉमस मनरो यांनी मद्रास इलाख्यांत रयतवारी पद्धत सुरू केल्यामुळे तेथे सरकारचा व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध येतो. इ. स. १८५७ साली मद्रासच्या रेव्हेन्यु बोडाने आपल्या रिपोर्टीत लिहिले आहे की, “यापुढे जमिनीचा सारा वाढविला नाही तरच मद्रासच्या शेतकऱ्यांस जमिनी राखतां येतील.” परंतु या रिपोर्टास न जुमानतां तेथे दर एक नव्या सर्व्हेच्या वेळी धारा झपाट्याने वाढू लागला आणि त्यामुळे इ. स. १८७७ साली उडालेली भयंकर कत्तल पाहून, इ. स.१८८२ साली आमच्या लोकप्रिय गव्हर्नर जनरल साहेबांनी ( लार्ड रिपन ) मद्रास