पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- बंगाल इलाख्यांतील कुळांना आपल्या जमीनदारांस आमच्या प्राचीन पद्धतीप्रमाणे जमिनीतील पिकाचा भाग किंबहुना कांहीं कांहीं प्रांतांत तर त्याहूनही कमी भाग द्यावा लागतो. व ही साऱ्याची पद्धती कायमची असल्यामुळे आतां तिकडील कुळांवर अधिक बोजा बसण्याचा संभव नाही. सर वुइल्यम हंटर यांनी "स्टॅटेस्टिकल अकौंट ऑफ बेंगाल " नावाच्या पुस्तकाचे वीस भाग लिहिले आहेत. त्यांत बंगालच्या निरनिराळ्या भागांतील दर एकरी पिकाची किंमत व त्यावरील देणे यांचे आंकडे दिले आहेत. त्यांवरून बहुतेक ठिकाणी हे मान : पेक्षा कमी असून नौखंडी परगण्याचें : पेक्षाही कमी, गयेचें :, आणि मिदनापूर व जसोर परगण्याचे तर पेक्षाही कमी आहे. अशा रीतीने बंगालच्या शेतकऱ्यांस कमी आकार भरावा लागल्यामुळे तेथील शेतकऱ्यांची स्थिति समाधानकारक आहे. त्यांना चांगली पिके आली म्हणजे शिल्लक टाकतां येते व तिचा उपयोग त्यांस दुष्काळाच्या सालांत होतो. या मुळेच इ. स. १८७४ सालाच्या व त्यानंतर १८९७ च्या दुष्काळांत बंगाल्यांत अन्नावांचून एकही मनुष्य मेला नाही. तीच मद्रास आणि मध्यप्रांताची स्थिति पहा! मद्रास इलाख्यांत १८७७ च्या दुष्काळांत मागें एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पन्नास लाख लोक मेले. आणि मध्यप्रांतांत १८९७ साली याहीपेक्षा अधिक लोकांनी अन्न अन्न करून प्राण सोडले. सन १८९९ साली तर सर्वत्रच