पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकारांत घेण्याचे ठरविलें; आणि जमीन महसूलावांचून बाकीचे सर्व कर मोडून टाकिले, हीच धाऱ्याची पद्धत पुढे मलिकबराने महाराष्ट्रांत चालू केली. रोकड आकार घेणे झाले, तर त्या वेळच्या बाजारभावाप्रमाणे घेत असत. मराठी राज्यांत जमीनमहसुलाच्या कमाल आकारांचे प्रमाण बहुतेक असेंच असे. परंतु या कमाल आकाराप्रमाणे नेहमीच वसूल करण्यांत येत नसे. वसूल करण्याच्या जमाबंदीस तनखा म्हणत व तो कायम करते वेळी प्रजेच्या तक्रारींचा योग्य विचार होई. ओसाड जमिनीवर हल्लीप्रमाणे कराची आकारणी होत नसे. व दुष्काळांत लोकांस पुष्कळ सूट देण्यात येई. बंगाल्यांत लॉर्ड कॉर्नवालिस याने कायम धाऱ्याची पद्धत सुरू केल्यास शंभरावर वर्षे होऊन गेली, तथापि त्याच्या त्या पुण्य कृत्याबद्दल सर्व देशांतील लोक अजून त्याचे नांव काढीत आहेत. व तीच पद्धत आमचे इकडे सुरू करा, ह्मणून आमची राष्ट्रीय सभा दरवर्षी सरकारास आग्रहाची विनवणी करीत आहे. बंगाल्यानंतर लौकरच वायव्येकडील प्रांतांपैकी बनारस जिल्ह्यांत व मद्रास इलाख्याच्या काही भागांत ही पद्धत सुरू करण्यांत आली. कायम धान्याच्या पद्धतीपासून जे फायदे आहेत, त्यांचा विचार करण्यापूर्वी बंगाल्यांत कायम व आमच्या इकडे सध्यांपुरत्या झालेल्या जमीनसान्याच्या आकारणीत काय अंतर आहे ते पाहूं.