पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशा प्रकारे सर्वस्वी शेतकरी बनलेल्या देशांत जमीन महसुलाचे नियम जितके सवलतीचे असतील, तितकें चांगले. तेथील प्रजेची सर्व संपदा कायती जमीन. तिच्यावरच नजर ठेवून सरकार जर आपली तुंबडी भरण्याचा प्रयत्न करील, तर लॉर्ड सॅलिस्बरी साहेबांची प्रजेचें रक्त शोषून घेण्याची राज्यपद्धतीच अमलांत आली ह्मणावयाची. ___ सरकारच्या एकंदर जमेकडे जर थोडी नजर फेंकली, तर असे आढळून येईल की, एकंदर ९५ कोटीजमेपैकी पंचवीस कोटींपेक्षा अधिक रक्कम जमीन बाबीचे उत्पन्न आहे. रिव्हिजन सर्व्हपूर्वी ते फक्त २१ कोटींचे होतें.. ही वाढ होण्यापूर्वीच सर आक्लंड कॉल्व्हिन, सर थिओडर होप, मद्रास सरकारच्या कौंसिलचे सभासद मि. फुलटन वगैरे बड्या बड्या इंग्रज अधिकाऱ्यांनीदेखील " जमीनबाबीचे उत्पन्न जरा वाढले आहे आणि यामुळेच शेतकरी लोक अगदी दरिद्री होत चालले आहेत. " अशा आशयाचे रिपोर्ट सरकारांत वारंवार केले आहेत. आमच्या पूर्वीच्या राजांची पद्धत मटली ह्मणजे उत्पन्नाचा सहावा हिस्सा जमिनीचा कर ह्मणून घ्यावयाचा अशी होती. बादशाही मंडळींत शिरशहा सूर याने जमीनधारा अगदी बेताचा ठेविला होता; परंतु या खात्याची खरी व्यवस्था अकबराच्या कारकिर्दीत राजा तोडरमल्लाने लाविली. त्याने सर्व जमिनीची मोजदाद व पहाणी करून तिच्या तीन प्रती केल्या; व पिकाची एकोणीस वर्षांची सरासरी काढून उत्पन्नाचा