पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व पुढे दाखविण्यात येणार आहेत त्या इतर चुकांकडे न । पाहतां फक्त त्यांचे जमीनमहसुलासंबंधाचे नियम अन्यायाचे व जुलमाचे असून त्यांमुळे लाखो प्रजाजनांस दुष्काळास बळी पडण्याची वेळ येतेकी काय,एवढेच पहावयाचे आहे. - एक संस्कृत कवि ह्मणतो की, "दिव्याविषयी नुसत्या गप्पा ठोकून कधी अंधार नाहीसा होत नाही.” अंधार नाहीसा करण्याला प्रत्यक्ष दिवाच लावला पाहिजे. सरकारी अधिकारी हिंदुस्थानांत एकादी नवी पद्धत सुरू करते वेळी आम्ही ती केवळ प्रजेच्या हितासाठी करितो, असे जरी बोलतात. तरी ती घातक असल्यास नुसत्या हिताच्या गोष्टी बोलून घातापासून प्रजेचे रक्षण होत नाही. पूर्वी साळी, रंगारी, मणेर, कुंभार, लोहार वगैरे अनेक प्रकारचे कारागीर खेड्यापाड्यांनिहाय राहून आपापल्या धंद्यावर उपजीविका करीत. परंतु आमच्या कल्याणाकारिता ह्मणून अप्रतिबद्ध व्यापाराचे तत्त्व दयाळू सरकारांनी जेव्हां आमच्या देशास लागू केले, तेव्हां यंत्रसाह्यानें परमुलखी तयार झालेल्या जिनसा इकडे येऊन, या शेतकामाविषयी अडाणी असलेल्या आमच्या कारागिरांस आपली हत्यारे फेंकून देऊन नांगर हांकावे लागले. याचा परिणाम असा झाला की, शेतकऱ्यांची संख्या शेकडा ९६ पर्यंत वाढली. आणि खडकाळ माळांवरसुद्धां लागतील तितके चोथे लावण्याकडे त्यांची प्रवृत्ति झाली. व पिकास नालायक जमीनसुद्धां लायक होऊन लागवड जमिनीचे प्रमाण दुपटीवर गेलें.