पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाहिजे. त्यांना लिहिणे, वाचणे, हिशेब करणे ही आमची शिक्षणाची मुख्य तीन अंगें चांगली अवगत झाल्यावांचून , इष्टकार्य होणार नाही. . इ. स. १८९७ पासून १९०२ पर्यंतच्या पांच वर्षी__चा हिंदुस्थानांतील शिक्षणखात्याचा रिपोर्ट पाहतां आमी शिक्षणांत फारच मागसलेले आहोत, असे दिसून येईल. एकंदर लोकसंख्येत शेकडा पंधरा शाळेत जाण्यालायक असून अवघे दोनही शाळेत जात नाहीत. ही एकंदर समाजाची तुलना झाली. शेतकरी वर्गाशी ही तुलना केली ह्मणजे प्रमाण फार कमी येईल, हे सांगावयास नको. प्रथम या शिक्षणाचा प्रसार करून नंतर वरिष्ट शिक्षण मिळविलेल्या लोकांकडून शेतकऱ्यांस त्यांच्या धंद्याचे प्रत्यक्ष शिक्षण देवविले पाहिजे. या संबंधांत तिसऱ्या औद्योगिक सभेपुढे जोशी यांनी दुसरा एक निबंध वाचला असून त्यांत सरकारास पुष्कळ सूचना केल्या आहते. परंतु आजपर्यंत तिकडे सरकारांनी विशेष लक्ष्य दिल्याचे दिसत नाही. सहावे कारण आपल्या देशांतील जमीन अत्यंत सुपीक असून तीत हवें तें पीक होण्यासारखे आहे,असे असतां सर चालस इलियट सेटलमेंट रिपोर्टीत म्हणतात त्याप्रमाणे येथे सात कोटींपेक्षा अधिक लोक अर्धपोटीं रहातात. याचे कारण जॉन ब्राईटच्या मते आमच्या राज्य व्यवस्थेतच कांहीं चुका असल्या पाहिजेत असे आहे. आतां या सहाव्या कारणाचा विचार करतांना आपणांस सरकारच्या मागे दाखविलेल्या