पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ जवस, तीळ, भुईमूग, करडी वगैरे गळिताची धान्ये, कापूस, ताग,वगैरे धाग्याचे जिन्नस, चहा,कॉफी वगैरे पेये करण्याचे * पदार्थ, आणि तंबाखु, गांजा, अफू वगैरे अमली द्रव्ये, अशी सर्व प्रकारची पिके आपल्या देशाच्या निरनिराळ्या भागांत उत्पन्न होतात. यावरून आपली जमीन किती उत्तम आहे बरें? परंतु या जमिनीतून पाऊस हवा तसा लागला, तरी योग्य पीक निघत नाही, याचे कारण शेतकऱ्यांस शेतकीचे शिक्षण योग्य प्रकारे नसणे हेच होय. हे शिक्षण देण्याचा विचार सरकारचे मनांत येऊन आज तीस पस्तीस वर्षे झाली. इ. स. १८६५ सालीं मद्रास इलाख्यापैकी सैदापेठ येथें कृषिविद्येची पाठशाळा स्थापन करून सरकारांनी या कामाचा पाया घातला.तेव्हांपासून लहान लहान वर्ग, शाळा, पाठशाळा यांची आपल्या देशांत बरीच संख्या झाली आहे. परंतु यांत शिकणारे विद्यार्थी केवळ सरकारी नोकरीच्या कामी उपयोगी पडतात. शेत कसणाऱ्या कुणब्यास यांपैकी एकाही संस्थेचा लाभ अद्यापि मिळू लागला नाही. बंगाल सरकारचे सेक्रेटरी नामदार नोलन म्हणतात की, " या देशांत शेतकऱ्यांना . शिक्षण नाही. व त्यांची मुलें अज्ञानांत बुडून गेली आहेत. जे शिकतात ते इतके थोडे शिकतात की, त्यापासून शेतकीला काहीच उपयोग होत नाही मटले, तरी चालेल." । शेतकऱ्यांस कृषिकर्मविद्येची माहिती करून द्यावयाची ह्मणजे त्यांच्यांत आधीं प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला