पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ कारण बसतो. ओलावा जास्त दिवस टिकण्याकरितां जमीन दाबण्यासाठी फेसाटी नांवाचे एक आऊत तयार करितात, परंतु त्यापासूनही इष्ट कार्य व्हावे तसे होत नाही. करितां या सर्व आऊतांत सुधारणा झाली पाहिजे. रा. जोशी यांनी त्यांना ज्या इष्ट वाटल्या त्या सुधारणा आऊतांत केल्या आणि त्यामुळे त्यांचा पुष्कळ फायदा झाला, असे त्यांच्या निबंधावरून दिसते. पांचवें कारण-शेतकीच्या जनावरांची जोपासना कशी करावी, कोणत्या जमिनीत कोणतें खत किती प्रमाणानें घातले असतां ती कोणत्या पिकांस पात्र होईल,थोड्या वेळांत आणि कमी खर्चात जमिनीची मशागत करण्याकरितां सध्यांच्या आऊतांत काय फेरबदल केला पाहिजे वगैरे गोष्टी आमच्या शेतकऱ्यांस जर चांगल्या समजल्या, तर जमिनीच्या उत्पन्नांत बराच इष्ट बदल होऊन आमची दुष्काळसंबंधी भीति थोडी तरी कमी होईल. परंतु तसे होण्यास शेतकऱ्यांस त्यांच्या धंद्याचे शिक्षण मिळाले पाहिजे. सध्यांच्या आमच्या शेतकऱ्यांस 'पिच्छेसे आई' या पंचाक्षरी मंत्रावांचून दुसरे काही समजत नाही. वडिलांनी जसें खत ठेविले असेल तसे चिरंजीव ठेवणार, त्यांनी जसा नांगर धरला असेल तसा हे धरणार, आणि त्यांनी शेतांत जसें बी पेरले असेल तसे हे पेरणार, असा प्रकार सर्वत्र दृष्टीस पडतो! तांदूळ, गहूं, ज्वारी, बाजरी वगैरे खाण्याची धान्ये,