पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न घेईल (ज० रानडे यांनी रॉयल ए० सोसायटी पुढे ता० ३० जून १९०० रोजी वाचलेला निबंध ) किंवा हल्लीच्या आमच्या काही संस्थानिकांप्रमाणे लागवड जमिनीच्या फक्त इतकाच ओसाड जमीनीवर धारा घेईल तर यूरोपांतील जमिनीपेक्षां आमच्या इंडियांतील जमीनीत अधिक पीक निघेल, ही गोष्ट अकबराच्या वेळचे पिकाचे मान व रा० जोशी यांचा वर दिलेला अनुभव यावरून सहज समजण्यासारखी आहे. यूरोपांतील कित्येक देशांत शेतकीची आऊतें चालविण्याच्या कामी देखील तीन राक्षसांपैकी बाष्पाची योजना करण्यांत आली आहे. परंतु आम्ही आपल्या जागेवरून एक अंगुळभरही पुढे सरत नाही. आमची प्रगतीच्या ऐवजी अधोगती झालेली मात्र प्रत्यही दृष्टीस पडते. हे ठीक नाही. जमिनीच्या मऊपणाप्रमाणे किंवा कठिणपणाप्रमाणे आह्मी आपल्या आउतांच्या रचनेत फेरफार केला पाहिजे. हल्लीच्या कुदळीने किंवा पाभरीने केलेली पेरणी दाट होऊन तिच्या योगाने पिकास धोका पोहचतो. प्रचलित नांगरांमुळे जमीन सारखी नांगरली जात नाही. यामुळे कित्येक वेळां सारखेपणा येण्याकरितां तीन तीन चार चार तासे करावी लागतात, व त्याला बैलांचाही मोठा खर्च असतो. जमीनीतील पूर्वीच्या पिकाचे बुडखे किंवा नव्या पिकांत मधून मधून रुजलेले गवत काढण्याकरिता कुळव नांवाचे एक आऊत असते. सध्या त्यांस दोन बैल लावतात; ते असलेल्या पिकाची अधिक नासाडी करितात व एका बैलाच्या फाजील खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर विना.