पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्कॉलरशिपा प्रत्येक इलाख्यास ठेवण्यात आल्या आहेत, ही बऱ्याच समाधानाची गोष्ट होय. दुष्काळाच्या प्रसंगी अमलांत आणण्याकरितां ह्मणून जरी कांहीं गुरचरणासंबंधानें दिखाऊ सरकिलरें निघत आहेत, तरी एकंदरीत अलीकडे गायरानासंबंधाचे नियम सक्तीने अमलांत येऊन शेतकीच्या गुरांची अधिक उपासमार होऊ लागली आहे व राबाची अधिक तूट पडूं लागली आहे. खतासंबंधाने पहातां, अमेरिकेत एका जर्मन पंडिताने जमीन टोचण्याचा जो प्रयोग केला, तो सफळ झाला. या पद्धतीचा उपयोग आमच्या शेतीकडे करून पहाण्यासारखा आहे. मुंबईस गेल्या दिसेंबरांत में प्रदर्शन भरले होते, ते पहाणारास आमच्या आउतांत किती सुधारणा करण्यासारख्या आहेत हे कळून आले असेल. देशांत शेतकीचे शिक्षण वाढविण्याकरितां दरसाल वीस लक्ष रुपये खर्च करण्याचा चालू सालापासून आमच्या सरकारांनी संकल्प केला आहे. या रकमेचा उपयोग केवळ मोठमोठाल्या इमारती आणि बड्या बड्या पगाराचे युरोपियन यांच्याकरितांच होऊन केवळ नोकरीच्या लायक माणसेच शिकविण्यांत न येवोत ह्मणजे झाले ! प्राथमिक शिक्षणाकडेही सरकार वर्षानुवर्ष अधिक रक्कम खर्च घालीत आहे, परंतु तिचा उपयोग शिक्षणप्रसाराकडे होत आहे असे दिसत नाही. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करावयाचाच तर तो श्री. गायकवाड सरकार यांनी अमरेळी तालुक्यांत जसा, सातपासून बारा वर्षेपर्यंत मुलांस शाळेत पाठविलेच पाहिजे, असा सक्तीचा नियम करून व फी न घेतां मुलांचा शिक्षणसंबंधी सर्व खर्च सरकारांतून देऊन