पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एका शेतांत तेंच पीक सतत काही वर्षे केल्यास जमीन निकस होऊन पीक कमी निघते. रा. जोशी ह्मणतात, " मी सतत सात वर्षे एका शेतांत ज्वारी पेरली आणि सातव्या वर्षी शेकडा वीस या मानाने कमी पीक आले" असें आहे ह्मणन पीक फेरपाळीने केले पाहिजे; आणि मध्येच एकाद्या वर्षी जमीन ओसाड टाकली पाहिजे. इ. स. १८७९ सालच्या फॅमिन कमिशनचे रिपोर्टीत सर जेम्स केअर्ड साहेब ह्मणतात " जमिनीस विश्रांति न देतां हिंदुस्थानांतील शेतकरी पिकामागून पीक काढतात; यामुळे हिंदुस्थामाची शेतकी झणजे एक जमीन निकस करण्याची पद्धतीच झाली आहे.” परंतु हा सर्व सरकारच्या धान्याच्या पद्धतीचा परिणाम आहे. हे लक्ष्यांत ठेविले पाहिजे. इंग्लंडांत सरासरीने दर एकरास १७०० पौंड गई उत्पन्न होतो आणि हिंदुस्थानांत तो अवघा सातशें पौंड उत्पन्न होतो. अमेरिकेंत दर एकरी दोनशे पौंड कापूस येतो तर येथें फक्त साठ पासून सत्तर पौंड पर्यंत येतो. बव्हेरियांत तांदूळ एका एकरास पंचवीसशें पौंड तर येथे आठशे पौड. अशा प्रकारे आमची जमीन सध्यां अगदी निकस झाली आहे. परंतु हा निकसपणा स्वाभाविक नसून तो कारणांनी आलेला आहे. सरकार द्रव्य दृष्ठीस फांटा देऊन जनावरांस चारा आणि शेतकीस राब मिळण्याकरितां जंगलचे नियम जरा सवलतीचे करील, हाडे आदिकरून शेतकीस लागणारी खते बाहेर देशी रवाना होतात ती कायद्याने अगदी बंद करील, आणि ओसाड जमिनीवर पूर्वीच्या आमच्या राज्यपद्धतीप्रमाणे मुळींच कर