पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वळण्यांत होतो तो न होतां तें खताच्या कामी लांगेल. गुरें व मेंढरे यांच्या मूत्राचा खताच्या कामी अत्यंत उपयोग होतो. परंतु आमच्या इकडील शेतकरी ते अगदीच फुकट घालवितात. सोनखताचा उपयोग शेतकीच्या कामी चांगला होतो हे शेतकऱ्यांस मान्य आहे; परंतु धर्माच्या वगैरे अडाणी समाजामुळे त्यांचे मन या गोष्टीकडे जितकें लागावे तितकें लागलेले दिसत नाही. या सोनखताविषयी रा. रा. गणेश व्यंकटेश जोशी यांनी आपला स्वतःचा अनुभव औद्योगिक सभेपुढे निबंध रूपाने मांडला आहे. त्यांत ते लिहितात, " मी शंभर छकडे सोनखत पांच एकर जमिनीवर पसरून त्यांत व दुसऱ्या खत न घातलेल्या जमिनींत ज्वारीचा पेरा केला. तेव्हां खत घातलेल्या जमिनीस एकरास २०४८ पौंड व खत न घातलेलीस एकरी ९०० पौंड पीक आलें ! शिवाय खत घातलेल्या जमिनींत कडबा व भूस वगैरेंचाही जास्त फायदा झाला. - मद्रास शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपाल मेहरबान राबर्ट्सन वगैरे सारख्या शेतकीच्या कामांत नाणावलेल्या विद्वानांचा असा अभिप्राय आहे की, हाडांचे खत सर्व खतांत चांगलें. जोशी ह्मणतात की, तें "ज्वारीचे पिकास फार चांगले उपयोगी पडते.” परंतु इंग्लंड, जर्मनी, बेलज्यम व फ्रान्स वगैरे देशांत ते येथून मोठ्या झपाट्याने रवाना होत असते. इ. स. १८९०९१ पासून इ. स. १८९७.९८ अखेरच्या आठ वर्षांत १७५११० टन हाडे फक्त मुंबईहून परदेशी रवाना झाली. असले शेतकीच्या उपयोगी पडणारे पदार्थ परदेशी नेण्याची कायद्याने बंदी झाली पाहिजे.