पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रहात नाहीत. ह्मणन अवश्य असेल तर शेतकऱ्यावर ओझ्या. मागें पै दोन पै कर ठेवून जंगलांतून राब आणण्याची परवानगी सरकारांनी त्यांस दिली पाहिजे. आतां शेतकीचे तिसरे कृत्रिम साधन जें खत त्याचा विचार करूं. आपण जमिनीतून धान्यादिकरून जे पीक काढितों, त्यामुळे ती निःसत्व होते. एकाद्या मनुष्याची शक्ति मानसिक व शारीरिक श्रमानें क्षीण झाली असतां चांगले पौष्टिक अन्न आणि व्यायाम यांनी जशी ती भरून काढावी लागते तशी पिके वाढल्यामुळे क्षीण झालेली जमिनीची उत्पादक शक्ति खताने भरून काढावी लागते. एकाद्या पिशवीत पुष्कळ जरी द्रव्य असले तरी त्यांत भर न पडतां नित्य त्याचा खर्च झाला तर ते जसें नष्ट होईल, तसें जमीन जात्या कितीही सुपीक असली, तरी, तीत सुपीक द्रव्यांची भर न घालतां ती द्रव्ये आपण त्या जमीनीतून पिकाच्या रूपाने काढूनच घेऊ लागलों, तर ती नापीक बनेल यांत कांहीं नवल नाही. - काही ठिकाणी खताने जमीन जळते असा समज असल्यामुळे शेतकरी त्याचा उपयोग मुळीच करीत नाहीत; आणि जेथें उपयोग करितात, तेथे त्यांस खत कसे ठेवावें हे माहित नसल्यांमुळे हजार पौंड खतापैकी फक्त अकरा पौंड खत जेमतेम त्यांच्या उपयोगी पडते. बाकीचे उघड्या हवेत राहिल्यामुळे निःसत्व होऊन जाते. शेतकऱ्याने दरसाल काही तरी झाडांची लागवड केली पाहिजे; ह्मणजे त्यांपासून शेतास राब आणि जळण्यास लांकडे तरी उत्पन्न होतील आणि मग शेणाचा उपयोग हल्ली जो गोवऱ्या