पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कडील प्रांतांत एका एकरास ११४० पौंड गहूं उत्पन्न होत, ते आतां अवघे ८४० पौंड होतात. जमीन तीच, शेतकऱ्यांची अक्कल तीच, आणि आउतांची स्थिति तीच; तर मग दर एकरी ३०० पौंड उत्पन्न कमी कां ? अर्थात् जमिनीमध्ये पडावा तितका राब पडत नाही व गुरांच्या कमतरतेमुळे आणि अशक्ततेमुळे तिची मेहेनतमशागत व्हावी तशी होत नाही. असें ह्मणावे लागते. सर वुईल्यम हंटर यांनी आपल्या इंडियन एम्पायर नामक पुस्तकांत झटले आहे की " देशांतील जगले तुटली, इतकेच नाही, तर पुष्कळ ठिकाणच्या लोकांनी कुरणांत लागवड केल्यामुळे फाजील जमीन लागवडीस येऊन गुरांस गवत मिळेनासे झाले.” हे त्यांचे मणणे अगदी खरे आहे. परंतु लोकांची खासगत जंगले तुटली आहेत. सरकारी जंगलाचा विस्तार सारखा वाढतच आहे. हे आह्मी पहिल्या कारणाचा विचार करीत असतां दिलेल्या आंकड्याकडे पाहून वाचकांच्या ताबडतोब लक्ष्यांत येईल. इ. स. १८७८ साली जेव्हां जंगलाचा कायदा पास केला; तेव्हां सरकारांतून " हा कायदा आह्मी उत्पन्नासाठी करीत नसून केवळ तुमच्या फायद्याकरितां करीत आहों, जंगल राखलें असतां हिदस्थानांत वारंवार पडणारे दुष्काळ थोड्या अंशाने तरी कमी करितां येतील असे आह्मांस वाटते; आह्मी उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न मुळीच करणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले. परंतु सरकारचे हे सांगणे केवळ तितक्या पुरतेच होते. ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या