पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कित्येक ठरावांस बाजूला सारून लोकांच्या मालकीच्या जमिनी बळकाविण्याचा आणि जंगले राखून उत्पन्न वाढविण्याचा क्रम त्यांनी मोठ्या झपाट्याने चालविला. इ. स. १८७७ साली फक्त मद्रास इलाख्याचें जंगलचे उत्पन्न साडेचार लक्ष होते; ते इ. स. १८८९ साली तेरा लाख झाले! ही फक्त मद्रास इलाख्याची गोष्ट ! सर्व हिंदुस्थानाचेही असेच झाले. इ. स. १८८१-८२ साली सर्व हिंदुस्थानचे जंगलउत्पन्न जवळ जवळ साडेसत्त्यायशी लक्ष होते; ते इ. स. १८९४-९५ साली जवळ जवळ एक कोटी पांसष्ट लक्षांवर आले. लोकांची जंगले तुटलीं; कांहीं सरकारांत बळकावली; आणि सरकारची दृष्टी जंगलचे उत्पन्न वाढविण्याकडे लागली, यामुळे जंगल रक्षणाचे नियम अत्यंत कडक झाले; व चाऱ्याच्या टंचाईमुळे लोकांची गुरें पटापट प्राण सोडूं लागली. इ. स.. १८९१ साली सातव्या राष्ट्रीय सभेच्या वेळी वीर राघवाचार्य ह्मणाले, “गेल्या वर्षी दोन तीन जिल्ह्यांत मिळून ८१ हजारांहूनही अधिक गुरें मेली. याचे कारण केवळ जंगल कायद्याचा कडकपणाच होय. काही जिल्ह्यांच्या कलेक्टरांनी तर हा कडकपणा कमी करण्याविषयी सरकारांत रीपो. र्टही केले आहेत.” एक मोठा ग्रंथकार हिंदुस्थाना. विषयी लिहितांना ह्मणतो की, " या देशांत शेतकीस पुरेसा जनावरांचा संग्रह नाही व ती चाऱ्यांच्या कमताईमुळे चांगली पुष्ट नसतात." विलायतेंतील कृषिकर्मोत्तेजक सभेचे मसलतगार डॉ० व्होएलकर अणतात, " जनावरांस हिंदुस्थानांत हवा तितका चारा न