पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ झणाल ? वेड्याच्या इस्पितळांत रवानगी करण्याबद्दल तुझी नाही का त्याची शिफारस करणार ? झाले. तर अगदी हीच स्थिति आज आमची आहे. “ बहुरत्ना वसुंधरा" ह्मणतात, त्याप्रमाणे ही आर्यवसुंधरा नानाप्रकारच्या द्रव्यांनी परिपूर्ण असतां आमी जर परदेशच्या खाणींनी दिपून गेलों व हिंदुस्थानचे भौमिक दारिद्य, दुष्काळाचे कारण ह्मणून प्रतिपादन करूं लागलों; तर आमी वरील आम्रवृक्षाश्रित मनुष्याच्या शेजारी आपली खाट मांडण्यास दवाखान्यावरील व्यवस्थापकांस सांगितले पाहिजे. हिंदुस्थानचे भौमिक दारिद्र्य हे आमच्या दुष्काळाचे कारण नव्हे, तर हिंदुस्थानची द्रव्ये, तेथील खनिज संपत्ति, ही बाहेर काढून त्यांचा सृष्टशक्तिच्या साह्याने पुष्कळ पक्का माल बनविण्याविषयी अनास्था व अज्ञान हे आमच्या दुष्काळाचे एक कारण आहे, ही गोष्ट वरील विवेचनाने वाच. कांच्या ध्यानात यावी, हाच या लेखकाचा हेतु आहे. आतां या तिसऱ्या कारणाचा शेवटचा भाग कोणत्याही देशाची जमीन नापीक असणे हा होय. त्याचे विशेष विवेचन पुढील कारणांचा विचार करते वेळी करणे बरे दिसते. चौथे कारण-अकबराच्या वेळेपासून आज तीनशे वर्षांत आमच्या शेतकऱ्यांस त्यांच्या धंद्यासंबंधी में शिक्षण मिळाले असेल आणि त्यांच्या आउतांत वगैरे जी सुधारणा झाली असेल, ती बाजूला ठेवली तरी अकबराच्या वेळी वायव्ये