पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काम चांगल्या रितीने बजावीत आहेत. बाकीच्या शाळांतून केवळ मूळतत्वेंच शिकविली जातात. मद्रास येथे इ. स. १८८६ साली एक व्यापारी शिशणाची शाळा निघाली असून तिचें काम फार चांगल्या रितीने चालले आहे. सरकारांनी देशांमध्ये अशा शाळा स्थापन केल्या ह्मणजे त्यांचे काम संपलें असें नाही, त्यांनी परदेशी, धंदेशिक्षणाचा किंवा व्यापारी शिक्षणाचा अभ्यास करण्याकरितां जाणाऱ्या विद्यार्थ्यांस उत्तेजन ह्मणून कांहीं स्कालरशिपा ठेवण्याची . व्यवस्था केली पाहिजे. कलाकौशल्य व उदीम व्यापार यांस उत्तेजन देण्याकरितां सरकारनी ज्याप्रमाणे शाळा स्थापिल्या पाहिजेत, आणि स्कॉलरशिपा ठेविल्या पाहिजेत, त्याप्रमाणेच लोकांनी यःकश्चित् पांच सात रुपड्याच्या पट्टेवाल्याच्या तरी सरकारी नोकरी करण्यांतच विशेष भूषण मानावयाचे आणि सिंधुनदी पलिकडे गेल्याने धर्मभ्रष्ट होतो अशी मूर्खपणाची कल्पना करावयाची सोडून विद्यार्थ्यास या शाळांतून पाठ. विले पाहिजे. व हा अभ्यास करण्याकरितां परदेशी जावयाची सारखी धडपड केली पाहिजे. एकादा मनुष्य अलगलेल्या फळांनी वांकलेल्या आम्रवृक्षाखाली बसून वाऱ्याच्या झुळकी बरोबर येणारा त्या फळांचा मधुर सुवास घेऊन "काय, बघा! दूरदूरच्या आंब्यावर फळे येऊन त्यांचा घमघमाट सुटला आहे; आणि हे झाड, हे अगदीच कसें वांझें? यावर एक देखील कैरी नाही. नशीब माझें की, मी याच खराव्या झाडाखाली येऊन बसलो." असें ह्मणेल, तर वाचक हो! तुझी त्याला काय