पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होती; परंतु १९०३।१९०४ या वर्षी विलक्षण टोळधाड आल्यामुळे मुंबई इलाख्यांतील पिकांचे फार नुकसान झालें. टोळ मारण्याचे कामीं शक्य तितके प्रयत्न सरकारांतून झाले. परंतु टोळांचा खरा नाश त्यांच्या अंडावस्थेत जेव्हां त्यांस मारले तेव्हांच झाला. सरकारांनी या कामी या वेळी सुमारे अडीच लक्ष रुपये खर्च केले. मोठ्या टोळांचा नाश त्यांना शेवटीं समुद्रस्नान घडूनच झाला. पाटबंधाऱ्याचे कमिशन बसले होते व बरीच रक्कम खर्च करून कित्येक ठिकाणी कालवे बांधण्याचा विचार कायम झाला आहे. परंतु ही कामें पुरी होऊन लोकांस उपयोग होऊं लागेल तेव्हां खरें ! सध्या या कामी खर्च झालेल्या भांडवलावर शेकडा सात टक्के व्याज पडूं लागले आहे. तथापि सरकारची रेल्वे वाढविण्याची हाव कमी होत नाही. जिऑलॉजिकल सर्हेचे अधिपति मि. हॉलंड यानी गेल्या जानेवारीचे सुमारास हिंदुस्थानच्या खनिज पदार्थाविषयीं जो पंचवार्षिक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, त्यावरून पाहतां, बऱ्याच नवीन खाणींचा शोध लागत असून, पुष्कळ खनिज संपत्ती बाहेर काढण्याचे शास्त्रीयपद्धतीवर बऱ्याच नेटानें प्रयत्न होत आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. मध्यप्रांतांतील लोखंड काढण्याकरितां टाटा यांनी दोन कोटींचे भांडवल उभारण्याचा विचार करून तत्संबंधी प्रयत्न व शोध ही मोठ्या झपाट्याने चालविली आहेत. तसेच या बाबतीत मैसूर सरकाराकडून होत असलेले प्रयत्न आमच्या संस्थानिकांनी अनुकरण करण्यासारखे आहेत. धंदे शिक्षणाकडेही सरकारचे लक्ष्य लागलेले दिसते. या शिक्षणाकरितां परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांस दरमहा दिडदिडशे रुपयांच्या दोन