पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शाळा स्थापन केली पाहिजे. सध्या सर्व हिंदुस्थानांत असल्या शाळा सुमारे सत्तर आहेत. या संबंधांत आज मुंबई इलाख्याचे पाऊल पुढे आहे. सरकारी रिपोर्टावरून पहाता इ. स. १८९८।९९ साली या इलाख्यांत धंदे शिक्षणाच्या शाळा सोळा, पैकी १५ खासगी व एक सरकारी, त्यांत शिकणारे विद्यार्थी १३४३ व त्या कामाकरिता एकंदर खर्च १८९५६८ रुपये इतका होत होता. बाकीच्या इलाख्याची स्थिति तर याहीपेक्षां फारच वाईट आहे. इ. स. १८९३।९४ साली या बाबतीत लोकांची कागाळी सरकारच्या कानावर गेली व नंतर स्थानिक सरकारचे अभिप्राय मागवून स्टेट सेक्रेटरी साहेबांनी एक ठराव प्रसिद्ध केला. त्यांत ते ह्मणतात की " धंदे शिक्षणाच्या शाळांचे स्वरूप बदलले पाहिजे. या संस्थांत असा बदल करावा की, त्यांत मिळणाऱ्या शिक्षणापासून लोकांस उपजीविकेची साधनें सुधारता येतील." परंतु गोड गोड असून केवळ कागदोपत्री राहणाऱ्या ठरावांपैकीच हा एक होता. त्याची अंमल बाजवणी होण्याचें दूरच राहिले; उलट सदर साली या शाळा अठरा पैकी सोळा खासगी व दोन सरकारी होत्या, त्यांत १४०४ विद्यार्थी शिकत होते आणि याकरितां २००५६५ रुपये खर्च होत होता; तें सर्व मान फिरून त्याचा वर लिहिल्याप्रमाणे हास झाला. सध्या असलेल्या शाळांपैकी इ. स. १८८८८९ साली स्थापन झालेले मुंबईचे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिटयूशन आणि सिंध प्रांतांतील करीदादखान यांची शाळा, मद्रास व कलकत्ता आर्टस स्कूल या मात्र आपलें